"वासुदेव उवाच"
"परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्याने सुखाच्या गतकालीन अस्तित्वाचं दु:ख उगाळत बसू नये आणि स्मरण झालं तरी त्याचं चिंतन करू नये."
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींची आरती

आरती वासुदेवा, माझ्या सद्गुरुवर्या | दत्तशक्ती अनघेची, साथ शक्तिजागरासी |
नमितो तव चरणी, दावि दया कृपाळा | योग याग भक्ती सवे, शुभ निर्मिल्या लहरी |
दया कृपाळा || आरती वासुदेवा ||धृ.|| निर्मिल्या लहरी || आरती वासुदेवा ||५||

परब्रह्म अवतारी, वर्ते सम अंतर्बाह्यी | तीर्थे यात्रा घडविली, संत समागमी धाली |
तेजोमय रूप तुझे, स्वरूप आनंद देई | वाढविली भक्ती अवनी, करवी कर्मे निष्कामी |
आनंद देई || आरती वासुदेवा ||१|| कर्मे निष्कामी || आरती वासुदेवा ||६||

लोपले यज्ञ जगी, जन अज्ञानी वर्तती | तूचिं वासुदेवानंद, तूचिं नृसिंह श्रीपाद |
यज्ञेश्वर नारायणे, दिला प्रकाश जनांसी | आळविता नाम तुझे, दत्ततत्त्व जाणे भक्त |
प्रकाश जनांसी || आरती वासुदेवा ||२|| तत्त्व जाणे भक्त || आरती वासुदेवा ||७||

विवेचनी दिले ज्ञान, अविद्येची बोळवण | ब्रह्मरूप निर्मळ तू, तूचिं अविनाशी सत्य |
तप दान सेवा व्रते, भक्तां दाविला सन्मार्ग | आस तव चरणांची, देई स्वरूप चिन्मात्र |
दाविला सन्मार्ग || आरती वासुदेवा ||३|| स्वरूप चिन्मात्र || आरती वासुदेवा ||८||

मूर्तीमंत वेद जाण, स्मर्तृगामी तूचिं नित्य | आरती वासुदेवा, माझ्या सद्गुरुवर्या |
साधने यंत्र मंत्रे, केली मने बळवंत | नमितो तव चरणी, दावि दया कृपाळा |
मने बळवंत || आरती वासुदेवा ||४|| दया कृपाळा || आरती वासुदेवा ||धृ.||


|| श्री सद्गुरु गजर ||
|| पतितोद्धारक ज्ञानसागर यज्ञेश्वर योगिराज सद्गुरु श्रीमान् वासुदेव बापट गुरुजी की जय ||