"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
जन्ममृत्यूच्या प्रवाहात पतित होऊन ह्या भूतलावर आपण अडकलो आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्यातून बाहेर पडून शाश्वताचा पैलतीर गाठणं आवश्यक आहे, असं आपलं अध्यात्म सांगतं. त्यासाठी आपल्याकडे यज्ञ, दान, तप, नामस्मरण, नामजप इ. अनेक साधनामार्ग सांगितले गेले आहेत. मात्र त्या सर्वांमध्ये पैलतीर गाठण्यासाठी खरोखरची आवश्यकता जर कोणती असेल, तर ती म्हणजे ‘ध्यान’!
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

सतत गमन होणाऱ्या शक्तीमध्ये बचत करणं हे ध्यानाचं प्रमुख उद्दिष्ट आहेच पण महत्त्वाचं आहे, मनाची शक्ती ओळखणं आणि ती वाढवणं. कोणत्याही तपसाधनेत शक्तिनिर्मिती हा मुख्य उद्देश असतो, परंतु ह्या शक्तीचं ग्रहण आणि तिची बचत, हे ध्यानाद्वारेच सर्वोत्तम रीतीने होऊ शकतं. ह्या अनुषंगाने ध्यान म्हणजे काय? ते कसे करावे? हे सांगून सद्गुरु श्री बापट गुरुजींनी सर्वसामान्यांना सहज करता येतील असे ध्यानाचे प्रकार सुचवले आहेत. तसेच ध्यानातील अडथळे व त्यावरील उपाय आणि ध्यानसाधनेसाठी साहाय्यक ठरतील अशा बाबींचा सखोल परामर्शही घेतला आहे. सहज सोप्या एकाग्रतेच्या युक्त्या सांगत श्री सद्गुरु आपल्याला “आता विश्वात्मके देवे” ह्या निर्गुणाच्या ध्यानापर्यंत अगदी सहजपणे घेऊन जातात.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B