"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या यज्ञसाधनेला काही हजार वर्षांचा इतिहास आहे. विश्वात निर्माण झालेले काहीही नष्ट होत नाही ह्या उष्णतागतिशास्त्राच्या नियमानुसार वातावरणात टिकून राहिलेल्या ह्या यज्ञ शक्तीशी समस्पंदित होणाऱ्या प्रत्येकाला ती यज्ञशक्ती मिळणारच. त्याकरिता आवश्यक आहे, ते या साधनेचे ज्ञानपूर्वक अनुसरण. ती ज्ञानदृष्टी सर्वांना प्राप्त व्हावी, म्हणूनच ‘यज्ञरहस्या’द्वारे हा वाग्यज्ञ अंगिकारला आहे.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

ह्या ग्रंथा मध्ये सामूहिक यज्ञसाधनेचे अंतरंग विज्ञानाच्या दृष्टीकोनातून समजावून देत यज्ञाविषयीचे अपसमज दूर केले आहेत. यज्ञामध्ये मंत्र, तंत्र आणि यंत्राचा समन्वय असतो. व्यक्तिकल्याणातून विश्वकल्याण हा यज्ञसाधनेचा मुख्य हेतू आहे. हेतू हा नेहमी गतीबरोबर प्रवास करतो आणि म्हणूनच सत्कर्माच्या हेतूने केलेली यज्ञसाधना सत्कर्माचा गुणाकार करते. ह्या साधनेमध्ये दृश्य विश्वात सर्वात जास्त गती असलेल्या प्रकाश शक्तीशी समगती प्रस्थापित करून शक्ती मिळवणे अपेक्षित आहे. सामूहिक यज्ञसाधनेमुळे शक्तीचा गुणाकार होऊन निर्माण झालेली शक्ती उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला समप्रमाणात मिळते. परंतु त्यासाठी अहंकारशून्यता, पूर्ण शरणागती आणि श्रद्धा असली पाहिजे.

हा ग्रंथ मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B