"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
विश्वभ्रमातून सुटण्यासाठी आत्मज्ञानाला पर्याय नाही आणि आत्मज्ञानासाठी आवश्यक असलेल्या शरणागतीलाही पर्याय नाही. नवरत्नमाला ह्या स्तोत्रामध्ये अत्यंत गहन अशा भारतीय तत्त्वज्ञानाची चर्चा, त्यातले सिद्धांत स्वामी महाराजांनी सरळ सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितले आहेत. आपणही त्या ब्रह्मतत्त्वाची ओळख करून घेऊ शकता. ह्यात अशक्य किंवा अतर्क्य काहीच नाही. अट एकच, की त्यासाठी प्रचंड तळमळ पाहिजे.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

स्वत:तच असलेलं ब्रह्मतत्त्वं कसं ओळखावं ह्याचं ज्ञान ह्या ग्रंथात दिले आहे. नश्वर पंचमहाभौतिक देह म्हणजे ‘मी’ नसून त्या देहात वसत असलेलं ब्रह्मतत्त्व तोच ‘मी’ आहे ह्याचं ज्ञान होणं म्हणजे आत्म ज्ञान होणं. त्या ब्रह्मतत्त्वापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत, आत्मा म्हणजे काय? आत्म्याभोवती असणारे पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश म्हणजे काय? ह्याचं अतिशय सोप्या शब्दात सखोल ज्ञान देऊन ह्या कोशांच्या आत असलेलं कूटस्थापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग अत्यंत सुलभतेने ह्या ग्रंथात दाखवला आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1