"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
साधना मार्गाची ही त्रिपदी म्हणजे तीन पावलं, स्वामी महाराजांनी जणू भक्ताचं बोट धरून चालायला शिकवली आहेत. सत्कर्मांच्या परिणामातही निसर्गनियमांप्रमाणे जे कालांतर जातं, त्या कृपा-प्रतीक्षेच्या काळातही मनोबल वाढवण्याची क्षमता, तेवढं सामर्थ्य करुणात्रिपदीत आहे. प्रत्येकाने ह्या स्तोत्रातलं स्वयंसिद्ध सामर्थ्य जरूर अनुभवावं.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

करुणात्रिपदीतील प्रार्थना ही व्यष्टीसाठी नसून समष्टीसाठी आहे. पहिल्या पदात अपराधांची स्वीकृती करून दुसऱ्या पदात सद्गुरुंशी समगती साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिसऱ्या पदात सद्गुरुंच्या विचारांशी समगती साधून गतिशून्यता कशी साधावी याचे मार्गदर्शन आहे. आमच्याकडून अनेक पापं घडली हे खरं, पण असं असलं तरी आमच्या पापांचं क्षालन कर ही ह्या स्तोत्रातील प्रमुख मागणी आहे. सद्गुरुतत्त्वामध्ये भक्ताबद्दल व्याकुळता निर्माण होण्यासाठी प्रथमत: पूर्ण शरणागती आणि अहंकारशून्यता भक्तांमध्ये निर्माण होणं हा ह्या स्तोत्राचा मूळ उद्देश आहे. म्हणूनच पापक्षालन होण्यासाठी करुणात्रिपदी व्याकुळतेने व आर्ततेने म्हटली गेली पाहिजे. करुणा आणि कीव ह्यामधला फरक अतिशय उत्तमरीत्या ग्रंथात सांगितला आहे तसंच स्तोत्रातले विज्ञान उदाहरणांसह स्पष्ट केले आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1