"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
वस्तुत: सगुण आणि निर्गुण ही तत्त्वे एकमेकांविरुद्ध नाहीत. निर्गुणाचा स्वीकार करताना, सगुणाचा त्याग अपेक्षित नाही व ते हिताचेही नाही. त्यांच्यातील परस्पर संबंधाला अनुसरून, निर्गुण तत्त्वाचा पुरस्कार करणारं उपनिषदांतील तत्त्वज्ञान आणि सामान्य मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनात त्याला आवश्यक असणारी सगुणोपासना यांचा उत्तम समन्वय श्री गुरुस्तुति ह्या स्तोत्रात आहे.
– प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी


ह्या स्तोत्राची देवता आहे ‘सद्गुरु’! निर्गुण तत्त्वाचं संस्करण आपल्यात होण्यासाठी आणि आपले मानसिक बदल सद्गुरुतत्त्वामध्ये होण्यासाठी जी स्तुती आवश्यक आहे ती म्हणजे श्रीगुरुस्तुति. ह्या स्तोत्रात निर्गुणाचं वर्णन आहे. सगुणाशिवाय निर्गुणाकडे जाता येत नाही. जे सगुण आहे त्यामध्येच आपल्याला निर्गुण बघता आलं पाहिजे, हे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचं महत्त्वाचं सार ह्या पुस्तकात सांगितलं आहे. स्तोत्रातली तत्त्वं वैज्ञानिक संदर्भांचा आधार घेऊन स्पष्ट केली आहेत.
हा ग्रंथ मराठीसह गुजराथी भाषेतही उपलब्ध आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1