"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी संपूर्ण देशात पदभ्रमण करून दत्तभक्तीचा प्रचार केला. स्वामी महाराजांचे आराध्य दैवत श्रीदत्त असले तरी प्रचार करताना त्यांनी अद्वैत मताची कास कधी सोडली नाही. त्यांनी ज्या ज्या मंदिरांना भेटी दिल्या, मग ती मंदिरं कोणत्याही देवी-देवतांची असोत त्या प्रत्येक देवतेवर त्यांनी स्वतंत्र स्तोत्ररचना केली आहे. आपले आराध्य श्रीदत्तात्रेय हेच आपल्यासमोर विशिष्ट रूप धारण करून उभे आहेत, ह्या एकत्वाच्या आणि एकरूपतेच्या भावनेने त्यांनी ह्या स्तोत्ररचना केल्या. त्या रचना मंत्रगर्भ आणि देवत्वाच्या उत्तम गुणवर्णनाचा एक श्रेष्ठ आदर्शच आहेत. काही रचनांमध्ये मोठ्या खुबीने त्यांनी वेदमंत्रांची गुंफण केल्यामुळे, त्या स्तोत्राच्या पठणाबरोबर त्या वेदमंत्रांचे पठण सामान्यांनाही आपोआप शक्य झालं. या स्तोत्रांतील अत्युच्च कोटीचं ज्ञान साधकांपर्यंत पोहोचावं आणि यज्ञसन्मुख पठणाकरिता ही स्तोत्रे एकत्रितरित्या उपलब्ध व्हावीत या सद्हेतूने केलेलं हे निवडक स्तोत्रांचं संकलन आहे. ह्यामध्ये अघोरकष्टोद्धरण स्तोत्र, करुणात्रिपदी, वेदपादस्तुती, श्रीकृष्णालहरी, इत्यादि स्तोत्रांचा समावेश आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B