अचलपूर वृत्तांत, २८-०६-२०१८
अघोरकष्टोद्धरण स्तोत्र प्रचार आणि प्रसार ७५ वा कार्यक्रम , अचलपूर, अमरावती
अमरावती जिल्ह्यात अचलपूर येथील बिलनपुरा येथील श्री. पाताळेश्वर मंदिरात प. पू. (टेंबे) स्वामी महाराज विरचित अघोर स्तोत्राचा ७५ वा कार्यक्रम परम पूज्य सद्गुरु बापट गुरुजींच्या कृपा-आशीर्वादाने संपन्न झाला. ह्यासाठी अमरावतीच्या सौ. रेणुकाताई देशमुख ह्यांचे सहकार्य लाभले. उपस्थित जन हे श्री. विष्णुदास महाराज साधना केंद्राचे साधक होते. केंद्राच्या द्वितीय वर्धापना निमित्त अघोर स्तोत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अतिशय पुरातन, सुंदर अशा पाताळेश्वराच्या मंदिरात अघोर स्तोत्राचा कार्यक्रम संध्याकाळी ७.०० – ९.०० ह्या वेळेत होता. नामस्मरणाने कार्यक्रम जोशात सुरु झाला. महाराजांविषयी माहिती, अघोर स्तोत्राची महती, सामुहिक अघोर स्तोत्र पठण आणि सद्गुरु कार्य व ग्रंथ परिचयानंतर नर्मदा मय्येच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित श्रोतृ वर्गही अघोरची महती जाणून स्तोत्र पठणात एकाग्र झाले होते. एकूणच कार्यक्रमामुळे वेगळीच अध्यात्मिक उर्जा जाणवत होती.
पावसामुळे जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून, बसून अनेक साधक एकाग्र होऊन श्रवण भक्ती करत होते. अघोर स्तोत्राचा गुह्यार्थ, भावार्थ थोडक्यात समजल्याने अनेकांच्या मनात अघोर ग्रंथाबद्दलही उत्सुकता होती. अनेकांनी ग्रंथही घेतले. भक्तीचा वेगळाच रंग श्री. पाताळेश्वराच्या मंदिरात अनेकांना अनुभवता आला.
|| सद्गुरुचरणार्पणमस्तु ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
गोरेगाव वृत्तांत, १३-०७-२०१८
अघोरकष्टोद्धरण स्तोत्र प्रचार आणि प्रसार ७८ वा कार्यक्रम , गोरेगाव, मुंबई.
(प्रतीक हवन)
मुंबई पश्चिम मधील गोरेगाव उपनगरात, पांडुरंग वाडीतील मसूराश्रमात,प. पू.धर्मभास्कर श्री. विनायक महाराज मसूरकर ह्यांच्या चरणी प. पू. (टेंबे) स्वामी महाराज विरचित अघोर स्तोत्र प्रचार प्रसारातील ७८ वा कार्यक्रम अर्थात अघोरकष्टोद्धरण स्तोत्र प्रतीक हवन, परमपूज्य सद्गुरु बापट गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झाला. ह्यासाठी सौ मसुरकर ताई आणि मासुराश्रमाचे विश्वस्त ह्यांचे सहकार्य लाभले. प.पू टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीदिवशी अघोर प्रतीक हवनाचा योग जुळून आला होता.
हिंदू धर्म, संस्कृती, समाज, व राष्ट्र उभारणीसाठी, संरक्षांसाठी व संवर्धनासाठी सर्व आयुष्याचा होम करून ६७ व्या वर्षी पंचतत्वात विलीन झालेल्या श्री स्वामीजी विनायक महाराज मसूरकर ह्यांच्या आश्रमात अतिशय सुंदर, शांत आणि शिस्तबद्ध स्वरुपात सायंकाळी ४-०० – ७.०० ह्या नियोजित वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यजमानांकडून संकल्प करून घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यज्ञवेदीची पूजा, दश दिशांचे पूजन, आणि मग गायत्री मंत्राच्या जयघोषात यज्ञ प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रकल्याण प्रार्थना, आवाहन मंत्रांनंतर स्वामी महाराज परीचय, अघोर स्तोत्र अनवयार्थ, मग प्रत्यक्ष अघोर स्तोत्र पठण आणि हवन, अशा प्रकारे क्रमाक्रमाने शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित भक्तांकडून हवन करवून घेण्यात आले. शेवटी सद्गुरु परिचय, नर्मदा मैय्या गजर, पूर्णाहुती, आशीर्वादपर दत्तात्रय स्तोत्र व शांती मंत्राने हवनाची सांगता झाली.
अतिशय चैतन्यमयी उर्जा लहरींनी भरलेल्या स्थानी प.पू स्वामी महराजांच्या पुण्यतिथीच्या शुभदिनी अघोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण आणि हवन म्हणजे अद्वीतीय असा अमृत योगच म्हणावा लागेल. उपस्थित श्रोतृवर्गही जाणकार असल्याकारणाने भावपूर्ण एकाग्रतेने श्रवण, मनन व हवनात सहभागी झाला. अनेकांनी कार्यक्रमाची प्रशंसाही केली. एकूणच कार्यक्रम, त्यातील शिस्त, त्यातील विभागीय नियोजित जबाबदाऱ्या सर्व काही इतकं सहज होत होतं, ज्यामुळे कार्यक्रमाला एक देखणं वलय असल्यासारखं वाटत होतं. अशा ह्या सद्गुरु कृपेचा आनंद सगळ्यांना श्री. स्वामी महाराज पुण्यतिथीच्या दिनी अनुभवता आला हे अहोभाग्यच.
||सद्गुरुचरणार्पणमस्तु ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
गणेशपुरी वृत्तांत, १४-०३-२०
श्री दत्तात्रेय स्तोत्र सामूहिक पठण आणि प्रतिक हवन १०३ वा कार्यक्रम
दिन विशेष – नाथषष्ठी
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
वसई वृत्तांत, १४ मार्च २०२०
श्री दत्तात्रेय स्तोत्र सामूहिक पठण आणि प्रतिक हवन १०४ वा कार्यक्रम
दिन विशेष – नाथषष्ठी
सर्व माहिती अधिकार © २०१८
Powered by PRAJAKTA SOFTWARE