"वासुदेव उवाच"
"कोणत्याही ईश्‍वरी शक्तीच्या प्रगटीकरणासाठी मानवी मनाची नि:शंक अशी अनन्य भक्तीच कारणीभूत असते."

|| श्री ||
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी प्रेरित
प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर (पूर्व)
आयोजित
श्रीगणेश स्तवन स्पर्धा – २०२२
(विनामूल्य)

ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या ||
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||

       जो “ॐ कार” स्वरूप आहे, जो आद्य आहे, जो वेदांचा प्रतिपाद्य विषय आहे, असा जो स्वत: जाणण्यास योग्य आहे आणि जो आत्मरूपाने अंतरंगात व्याप्त आहे, अशाचा जयजयकार असो.
       माऊली संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे सकलांची मति ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा हा आत्मरूप गणेश. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा हा आदिदेव गणपती. असा हा बाप्पा आपणा सगळ्यांनाच वंदनीय आणि प्रियही आहे. या बाप्पाची स्तुती,  त्याचे गुणगान करण्याचा प्रयत्न म्हणजे "गणेश स्तवन".
       सन २०२२ मधील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आणि परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजींच्या प्रेरणेने, प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) घेऊन येत आहे "गणेश स्तवन" ऑनलाईन स्पर्धा.
       परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी दिलेल्या प्रेरणेनुसार सन २०१४ मध्ये प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर ह्या संस्थेची नोंदणी करण्यात आली. समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नयनाकरिता ही संस्था सद्गुरु श्री बापट गुरुजींनी आखून दिलेल्या तत्त्वांवर कार्य करते आहे. दरमहा दुसऱ्या रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या यज्ञ साधने बरोबरच अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन संस्थे मार्फत होत असते.
       भारतीय तत्त्वज्ञान व आध्यात्मिक साहित्यातील स्तोत्र-मंत्रांच्या शुभलहरी ऋषीमुनींच्या हजारो वर्षांच्या साधनेने, पठणाने वातावरणात सिद्ध झालेल्या आहेत आणि आजही त्या स्तोत्रमंत्रांशी समरस होणाऱ्या  व्यक्तीला त्यांचा लाभ होत असतो. आधुनिक पिढीत त्या स्तोत्र-मंत्राबद्दल आस्था निर्माण करणे व त्याद्वारे आपल्या ह्या जाज्वल्य परंपरेच्या अभिमानाचा स्फुल्लिंग पेटवणे ह्या शुभ हेतूने, संस्था हा उपक्रम सुरू करत आहे.
        बुद्धीदेवतेच्या स्तवनाची ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अगदी बालवाडी ते महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानादेखील ह्या स्पर्धेत सहभागी होता येईल. अटी फक्त तीन. उच्चार स्पष्ट असावेत, स्तवनात भाव असावा आणि पठणात लय असावी !  चला तर मग. . .  ह्या गणेश स्तवन स्पर्धेत भाग घेऊया.

  • स्पर्धेची रूपरेषा
          पुढील कोष्टकातील स्पर्धकांच्या वयोगटानुसार गणेश स्तवन स्पर्धेची लिखित स्तोत्रे आणि मंत्र खाली दिलेल्या टेबलमधये, PDF Link ह्या स्तंभात दिलेले आहेत. आपल्या वयोगटानुसार योग्य त्या स्तोत्र/मंत्र/श्लोकांचे पठण करून तो व्हिडीओ स्पर्धकाने आम्हाला पाठवावयाचा आहे.
स्पर्धेसाठी नावनोंद करण्यास इच्छुक विद्यार्थ्याने पुढील गुगल फॉर्म भरावा.
Google Form Link: https://forms.gle/yGdJMc1jtyoAb2RF8

  • स्पर्धा गट
खाली दिलेल्या वयोगटानुसार आणि शैक्षणिक वर्गानुसार प्रत्येक इच्छुक स्पर्धकाने सहभाग घ्यायचा आहे.
क्र शैक्षणिक गट स्तोत्र/मंत्र/श्लोक PDF Link
  •  
बालवाडी श्री गणेश पाच श्लोक
  • ओम नमोजी आद्या,
  • वक्रतुंड महाकाय,
  • प्रारंभी विनती करू गणपती,
  • मोरया मोरया मी बाळ तान्हे,
  • नेत्री दोन दिवे प्रकाश पसरे
बालवाडी गणपती श्लोक
  •  
इयत्ता पहिली व दुसरी परामहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज विरचित श्री गणेश स्तोत्र- गणाधिनाथा पवित्र गाथा. गणपतीचे पद
  •  
इयत्ता तिसरी व चौथी श्री गणेश करुणा श्लोक
(१ ते १०)
श्री गणेश करुणाश्लोक १ ते १०
  •  
इयत्ता पाचवी व सहावी श्री गणेश करुणा श्लोक
(श्लोक १ ते २१)
श्री गणेश करुणाश्लोक १ ते २१
  •  
इयत्ता सातवी व आठवी श्री आद्य शंकराचार्य विरचित श्री गणेश पंचरत्न स्तोत्र गणेश पंचरत्न स्तोत्र
  •  
इयत्ता नववी ते बारावी श्री गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती सह गणेश अथर्वशीर्ष
  •  
इयत्ता प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रम श्री गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती सह गणेश अथर्वशीर्ष

  • गुणप्रणाली आणि परीक्षण
ही स्पर्धा एकूण ५० गुणांची असेल. ह्यामध्ये स्पष्ट उच्चार आणि बिनचूक पठणासाठी ३० गुण, लयबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरण २० गुण

  • स्पर्धेच्या अटी
    १. ही स्पर्धा उपरोक्त गटातल्या सर्व इच्छुक स्पर्धकांसाठी खुली असून, सहभाग घेण्यासाठी कोणत्याही नागरिकत्त्व /धर्म/ जात/पंथ/ लिंग/भाषा  इत्यादीची अट नाही.
    २. सर्व गटांच्या श्लोक/मंत्र/पद यांची सुवाच्य pdf  संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल आणि त्यानुसारच परीक्षण करण्यात येईल. अतिरिक्त मजकूर टाळावा.
    ३. स्तोत्र /मंत्र /पद पठण करण्यापूर्वी स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, शहराचे नाव, इयत्ता सांगून झाल्यावर त्यानंतर पठणास प्रारंभ करावा.
    ४. स्तोत्र/मंत्र/पद हे न बघता, न वाचता पठण करायचे असून पालकांनी मुलांची योग्य तयारी आणि पाठांतर करून घेणे आवश्यक आहे.
    ५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार योग्य श्लोक/मंत्र/पद ह्याची तयारी करून त्याच्या पठणाचा व्हिडियो तयार करून तो आम्हाला events.yadnya@gmail.com येथे शेयर करावा.
    ६. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांचे व्हिडियो संस्थेच्या YouTube Channel वरून मर्यादित काळासाठी प्रसारित केले जातील.
    ७. चुकीचे व्हिडियो,  ओपन न होणारे व्हिडियो, चुकीची स्तोत्र /मंत्र निवड अथवा चुकीची माहिती देणारा स्पर्धक बाद केला जाईल.
    ८. संस्थेचे परीक्षण तसेच निर्णय अंतिम असतील. कोणताही  राजकीय , सामाजिक अथवा व्यक्तिगत वशिला लावल्यास स्पर्धक बाद करण्यात येईल.

  • महत्त्वाच्या तारखा :
          स्पर्धेत नावनोंद करण्याची अंतिम तारीख : २५ जुलै २०२२ सोमवार
          स्पर्धेचे व्हिडियो पाठवण्याची अंतिम तारीख : १० ऑगस्ट  २०२२ बुधवार
          स्पर्धा निकाल जाहीर करण्याची तारीख : १० ऑगस्ट २०२२
          बक्षीस समारंभ : ११ सप्टेंबर २०२२ यज्ञसन्मुख


  • विडिओ संबंधित मार्गदर्शक सूचना

    • मोबाईल वर व्हिडिओ रेकॉर्ड करतांना मोबाईल स्थिर असावा. चेहर्‍याच्या खूप जवळ किंवा फार लांब नसावा.
    • आपल्या चेहर्‍यावर उजेड असेल अशा पद्धतीने बसावे. आजूबाजूस कोणताही आवाज / गोंधळ नसावा.
    • उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध होण्यासाठी आपल्या श्लोक/स्तोत्र/पद/मंत्राचा व्यवस्थित सराव करून रेकॉर्डिंग पूर्वी काहीक्षण ध्यान करावे आणि मग प्रसन्न चित्ताने रेकॉर्डिंग करावे.
    • लहान मुलांना पालकांनी Prompting करू नये.
    • वेशभूषेचे बंधन नाही, पण पारंपारिक पोषाख असल्यास उत्तम.
    • सुरवातीला स्वतःचे पूर्ण नाव, रहाण्याचे ठिकाण, स्पर्धेचा गट आणि श्लोक/स्तोत्र/पद/मंत्राचे नाव सांगावे.
    • रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर तुमची व्हिडिओ फाईल events.yadnya@gmail.com या ईमेल वर पाठवा.
    • ईमेल करतांना व्हिडिओ फाईल 25 MB पेक्षा मोठी फाईल असल्यास, ती तुमच्याच email च्या drive वर सेव्ह होत असल्याचे नोटिफिकेशन दिसेल आणि आम्हाला त्या फाईलची Link ईमेलने प्राप्त होईल. 

  • बक्षीस समारंभ
प्रत्येक गटातले प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेते जाहीर केले जातील आणि त्यांना त्यांच्या पालकांसह बदलापूर येथे रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या सामुहिक यज्ञासाठी निमंत्रित केले जाईल. यज्ञ साक्षीने, श्री सद्गुरुंच्या प्रेरणेने  आणि पूज्य आई साहेबांच्या (श्रीमती अनघा ताई बापट यांच्या) शुभ हस्ते बक्षीस वितरण केले जाईल. इतर सर्व स्पर्धक आणि त्यांच्या पालक, आप्त स्वकीयांचे सुद्धा यज्ञात सहभागी होण्यासाठी स्वागत आहे. यज्ञा विषयी आणि यज्ञ स्थळाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी www.yadnya.in ह्या संकेत स्थळाला भेट द्या.
  • स्पर्धा शुल्क : बाप्पाची ही स्तवन स्पर्धा विनामूल्य आहे!
  • अधिक माहिती साठी संपर्क
  • सौ आरती पोंक्षे – 9769356123
  • श्री यशोधन बापट – 9323195713
  • श्री राजेश कुलकर्णी – 9920992307

विजेत्यांची नावे
बालवाडी
1 सान्वी तुषार वाजे
2 शरण्या चेतन गोवेकर
3 अव्यान अक्षय सप्रे
उत्तेजनार्थ रेवा योगेश झुंजारराव 
उत्तेजनार्थ कणाद केशव भागवत 
 इयत्ता पहिली व दुसरी
1 श्रेया रवींद्र खानविलकर
2 हर्ष हेमंत कुबळ 
3 रिदम गजानन टाकळे 
3 नमिश रवींद्र पाटील पाटील 
इयत्ता तिसरी व चौथी
1 साक्षात विश्वास जमघरे
2 सुश्रुत अंकुश कुलकर्णी 
3 मिहिका प्रशांत मश्रम
इयत्ता पाचवी व सहावी
1 अनुश्री महेश जोशी 
2 स्वरा जोशी
3 हर्ष हेमंत पाटील
इयत्ता सातवी व आठवी
1 ध्रुव धरप 
2 योगेश्वरी  पोंक्षे
3 रुजुला खंडारे 
इयत्ता नववी ते बारावी
1 श्लोक ज्ञानदेव पावसे 
2 चारुदत्त विवेक महाबळ
3 विश्वा राजेश  कुमार रावल 
 इयत्ता प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष
1 संपदा विवेक महाबळ
2  सिद्धार्थ मकरंद पोवळे
3 प्राजक्ता मंगेश सुर्वे