परमपज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी
(अल्प परिचय)
विज्ञान व अध्यात्म’ हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात असे प्रतिपादन करणारे परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांचा हा अल्प परिचय.
वेदमूर्ती वेदाचार्य’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या वडिलांकडून अग्निहोत्र परंपरा आणि वेदांचे शास्त्रोक्त अध्ययन प्राप्त झालेल्या श्रीसद्गुरुंनी सन १९८१ ते १९९३ ह्या काळात त्यांचे ज्ञानगुरु स्वामी विज्ञानानंद ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानाधिष्ठित ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आणि ह्या दोन्हींच्या चिंतनानंतर श्रीसद्गुरुंनी जात, धर्म, पंथ, लिंग इ. भेदरहित सामूहिक यज्ञाचा संकल्प केला. यज्ञातले मूळ तत्त्व अबाधित ठेवून बदललेल्या समाजरचनेला अनुरूप आणि उचित अशी मंत्रशक्तीच्या सामर्थ्यासहित प्रकाशावर केलेली एकाग्रता ह्या साधनस्वरूपातील यज्ञसंकल्पना श्रीसद्गुरुंनी स्वीकारली. समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना ह्या प्राचीन साधनेचा लाभ घेता यावा, ह्या आंतरिक तळमळीने श्रीसद्गुरुंनी सुरुवातीस मार्च 1994 मध्ये लावलेल्या 108 सामूहिक यज्ञांच्या संकल्परोपट्याचे रूपांतर, त्यांच्याच प्रेरणेने दरमहा घेतल्या जाणार्या गायत्री यज्ञ, रुद्र स्वाहाकार, शतचंडी स्वाहाकार, गणेश यज्ञ, विष्णु यज्ञ इ. सुमारे ३७० च्या वर एक दिवसीय व सात दिवसीय सामूहिक यज्ञांच्या शाखा पल्लवांसहित उभ्या असलेल्या दिमाखदार वृक्षात आज झाले आहे.
यज्ञसाधनेव्यतिरिक्त जन्मपूर्व गर्भसंस्कार, सामूहिक विद्याव्रत संस्कार, सामूहिक सत्यदत्तपूजा, लक्षार्चना, सत्संग मेळावा, मोफत वैद्यकीय समुपदेशन, विद्यार्थी साहाय्य योजना, आदिवासी शिक्षण संस्था साहाय्य योजना, रक्तदान शिबीर अशी अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्येही श्रीसद्गुरुंनी सुरू केली. श्रीसद्गुरुंच्या प्रेरणेने प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली आहे. प.पू. भाऊ महाराज करंदीकर ह्यांनी सन २००२ मध्ये केलेला “नमो गुरवे वासुदेवाय’’ ह्या नामाचा १५१ कोटींचा जपसंकल्प त्यांचेनंतर श्रीसद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने सन २००८ मध्ये अर्चन-मार्जन व हवनासहित पूर्ण झाला. श्रीसद्गुरुंच्या प्रेरणेने, प.प.श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचे अधिष्ठान असलेल्या ह्या नाममंत्राचा पुढील १०१ कोटींचा जपसंकल्पदेखील श्रीस्वामी महाराजांच्या २०१४ मधील १०० व्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर पूर्ण झाला. श्रीस्वामी महाराजांच्या खोपोली येथील मूर्तिस्थानाला २०१५ मधील श्रीदत्तजयंतीला २५वर्षं पूर्ण झाली. ह्या निमित्ताने ह्या नाममंत्राचा पुढील २५ कोटी नामजप, २५ लाख लिखित जप, २५ नामस्मरणे आणि सामूहिक २५० श्रीसत्यदत्तपूजा असा महासंकल्पदेखील पूर्ण झाला आहे. श्रीसद्गुरुंच्या प्रथम स्मृती दिनाप्रीत्यर्थ भक्तांनी ११ कोटी नामजपाचा सामूहिक संकल्प त्यांचे चरणी नोव्हेंबर २०१६ च्या यज्ञात अर्पण केला. सारांशाने आजवर सद्गुरु प्रेरणेने एकंदर २७५ कोटींपेक्षा अधिक मात्रेने स्मरल्या गेलेल्या ह्या नाममंत्राची, यंत्रासह केली जाणारी साधना ह्यापुढेही गुरुकृपादानाचे फळ भक्तांना निरंतर देत राहिल.
श्रीगुरुचरित्राचे सोळा वर्षे केलेले नियमित पारायण, सात वर्षांच्या पठणासहित सिद्ध केलेली श्रीरामरक्षा, ह्या व अशा कित्येक तपचक्रांसह आध्यात्मिक विश्वसमृद्धी असलेले श्रीसद्गुरु, प्रत्येक साधकाकडून ज्ञानपूर्वक तप घडावे, जेणेकरून त्यांची अध्यात्मात पत वाढावी व त्यांच्या जीवनाची प्रत सुधारावी, ह्यासाठी एकवीसहून अधिक वर्षे अहर्निश कार्यरत होते. त्याच दृष्टिकोनातून श्रीसद्गुरुंनी प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पालखीसह सुमारे ३२०साधकांसहित केलेला नर्मदा परिक्रमेचा संकल्प नोव्हेंं-डिसें. २०११ मध्ये पूर्ण केला. परिक्रमेदरम्यान नर्मदातीरी ठिकठिकाणी ११ सामूहिक यज्ञांची यज्ञमाला नर्मदा मय्याला अर्पण झाली. सप्टें-ऑक्टो. २०१२ मध्ये सुमारे तेवढ्याच साधकांसहित चारधाम-पंचप्रयाग यात्रा ११ सामूहिक यज्ञांच्या आयोजनासह संपन्न झाली. सन २०१४ मध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांवर क्रमशः घेण्यात आलेली शक्तिस्वाहाकाराची मालिकादेखील पूर्ण झाली.
प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले श्रीसद्गुरु प्रत्येक यज्ञप्रसंगी साधकांच्या ज्ञानवर्धनासाठी आपल्या रसाळ आणि आंतरस्पर्शी ओघवत्या शैलीत विवेचन करत असत. विविधांगी विषयांवर तसेच सत्पुरुषांच्या स्तोत्ररचनेवर श्रीसद्गुरुंनी केलेल्या विवेचनांना नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळत असून आजवर त्यांची भाषांतरीत आणि संकलनात्मक धरून एकूण 30 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि आणखी काही पुस्तके प्रकाशनमार्गावर आहेत.
”जे पटले, तेच आधी आचरले, मग सांगितले आणि करवूनही घेतले’ अशी कार्यवृत्ती असणाऱ्या श्रीसद्गुरुंनी, स्वीकारलेल्या तत्त्वांचा अखंड प्रचार केला आणि आपल्या वर्तनातून सत्कर्माविना राहू नका’ असा संदेश साधक-भक्तांना दिला. ६२ वर्षांच्या आयुर्मर्यादेत झंझावाती कार्य करणार्या ह्या आधुनिक यज्ञपुरुषाने कार्तिक शुद्ध चतुर्थी शके १९३७ अर्थात दि. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली आणि ते ब्रह्मतत्त्वात विलीन झाले. आपली उन्नती साधून घेण्याचा हक्क निसर्गाने प्रत्येकाला दिलेला आहे, ’ असं सांगत साधक-भक्तांना त्यांच्या शाश्वत कल्याणासाठी सामूहिक यज्ञपरंपरेचा वारसा देणाऱ्या ह्या महापुरुषाला शतशः नमन!!
This is a brief introduction of Param Poojya Sadguru Shri Vasudev Vaman Bapat Guruji who strongly believed that science and spirituality can be studied together.
From 1981 to 1993, Shri Sadguru studied the path of knowledge with scientific base under the guidance of Swami Shri Vidnyanananda. Thereafter Shri Sadguru realised that combining this path of knowledge along with spirituality creates tremendous spiritual energy. Yajna, the ancient Indian ritual of fire offerings, is a great boon given to the humankind. Shri Sadguru believed that the spiritual practice of yajna must be propagated for the physical and spiritual upliftment of the community. With this in mind he resolved in March 1994 to perform collective yajnas every second Sunday of the month, in order to enable large number of participants to avail of its benefits. Initially he made a resolution of 84 Yajnas for seven years and thus the first Gayatri Yajnas began every month.
Shri Sadguru was trained in the ‘Agnihotra’ traditions and Vedic ideology by his late father who was revered as “Vedamurti Vedacharya” because of his studies in Yajurveda and Atharvaveda and had been given the respectful title of “Dikshit”. Shri Sadguru had also done Shri Gurucharitra Parayana for 16 years and had regularly recited the Ramaraksha stotra for seven continuous years.
Apart from the Gayatri Yajnas, Rudra Swahakar and many more Yajnas were subsequently added to the resolution of conducting a monthly collective Yajna. The scientific and spiritual importance of Yajna, which brings the society collectively together, is explained by Shri Sadguru through his discourses. ‘Light’ is a form of energy. Shri Sadguru constantly strived all through his life to help people derive the benefits of light energy by teaching them to perform ‘jyotirdhyan’ through the medium of the Yajna. Many people have benefited till date by Yajna sadhana.
Up till now that is till 25 March 2018, more than 370 yajnas have been conducted, which includes the yajnas held for three and seven days consecutively. Besides these, annual yajnas of seven days were held at various teerthas (holy places). Paramapoojya Sadguru gave spiritual discourses during these occasions. Shri Sadguru’s discourses are indeed priceless for his disciples. These discourses are being published regularly in newspaper supplements, monthly and quarterly magazines. A compilation of his discourses on specific topics are also being published in book form. Usage of easy-to-understand lucid language with pertinent anecdotal stories and reference to relevant scientific studies was a notable feature of all his discourses.
Paramapoojya Sadguru Shri Bhau Maharaj Karandikar had made a resolution of completing 151 crores of the Naamjap ‘Namo Gurave Vasudevay’ in the year 2002. But after Sadguru Shri Bhau Maharaj Karandikar left for the heavenly abode in the year 2004, this resolution was completed under the guidance of Shri Bapat Guruji in the year 2008 and this Naamjap achieved the power of a ‘Siddha Mantra’. Thereafter Shri Sadguru made a resolution of 101 crore of Naamjap which was completed in the year 2014, the centenary year of Paramapoojya Parivrajakacharya Vasudevananda Saraswati Tembe Swami Maharaj’s Mahasamadhi. Further Naamjap resolution of 25 crores was also completed in commemoration of the 25th anniversary of Shri Swami Maharaj’s Moortisthan at Khopoli, Maharashtra. Till date more than 275 crores of Naamjap resolution of this siddha mantra has been completed by the devotees.
In November 2011, Sadguru Bapat Guruji accompanied by more than three hundred disciples, successfully completed Shri Narmada Parikrama alongwith 11 yajnas for the benefit and spiritual upliftment of devotees. In the year 2012, he completed the Chota Chardham yatra with equal number of disciples and yajnas.
Shri Sadguru defined religion as an activity which enables upliftment of society. Under the guidance of the Sadguru Bapat Guruji various social and spiritual activities take place, such as Bhakti satsang, Gayatri Mantra inititation ceremony, Baalsamskar, blood donation and health camps, free medical counselling, educational support to the needy students, and most importantly the ‘Janma Poorva Samskar’ which is held for the better future of the society.
Shri Sadguru always blessed his disciples to adopt a meaningful life of pious deeds, gain a higher stature in society and spirituality, leading to overall improvement in quality of their own lives and that of the entire society.
Param Poojya Sadguru Shri Bapat Guruji left his mortal body on 15th November 2015 i.e. Kartik Shuddha Chaturthi. His immortal energy continues to guide all the disciples through his thoughts and teachings.