आपल्या जीवनातील अंधकाराचा नाश होण्याकरिता साधकाने कर्माची वात, भक्तीचं तेल आणि आत्मजाणीवेची ज्योत लावून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी सद्गुरुतत्त्वासमोर संपूर्ण शरणागती स्वीकारण्याचा संकल्प केला पाहिजे. साधकाची ज्ञानजिज्ञासा, भक्ती आणि साधननिष्ठा वाढवून ज्ञान, कर्म आणि भक्ती मार्गांवरची एकत्रित साधना करण्याचा संदेश ज्ञानदीप उजळूदे या पुस्तिकेद्वारे दिलाआहे.
– प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी
ऐंद्रिय ज्ञानाला मर्यादा असतात कारण इंद्रियांवर अवलंबून राहिल्याशिवाय मनुष्याचा मेंदू ते ग्रहण करू शकत नाही. म्हणूनच मनुष्याला पूर्वजन्मांच्या कर्मांचं आकलन होत नाही. ऐंद्रिय संवेदनांच्या पलीकडे असणाऱ्या विश्वाचं ज्ञान होण्यासाठी संपूर्ण अध्यात्माचा पाया रचला आहे. ह्या अध्यात्मज्ञानालाच खरं ज्ञान म्हटले आहे. त्या अनुषंगाने पाच प्रकारचे क्लेश, क्लेशावस्था, बंधक कर्म, जीवनचक्र, इ. विविध विषय श्री सद्गुरुंनी समजावले आहेत.
Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B