"वासुदेव उवाच"
"संसार हा खैराचा वृक्ष आहे, चढायला लागलात की इतके काटे बोचतात की तुम्हाला आईचं दूध आठवतं."
श्रीनर्मदा परिक्रमा म्हणजे एका प्रकारे आपली आध्यात्मिक प्रगती जोखण्याचा प्रकार आहे, हे समजून घेऊनच ती परिक्रमा करता आली पाहिजे. परिक्रमेपूर्वी, परिक्रमा घडत असताना आणि परिक्रमेची तप:पूर्ती झाल्यानंतरही परिक्रमा कशासाठी, कोणी आणि कशाप्रकारे करावी ह्याचं सर्वंकष ज्ञान श्रीनर्मदापरिक्रमा – एक अभ्यास पूर्ण आनंद यात्रा या ग्रंथातील विविध विवेचनांमधून देण्याचा प्रयत्न केला आहे.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

सन २०११ मध्ये परम पूज्य सद्गुरुंनी आपल्या तीनशेहून अधिक लहान-थोर भक्तांना घेऊन श्री नर्मदा मय्याची पालखी परिक्रमा केली. ह्या परिक्रमेचा नियोजनापासून ते फलश्रुती पर्यंतचा आढावा ह्या ग्रंथात घेतला आहे. त्याचबरोबर परिक्रमेच्या दरम्यान श्री सद्गुरुंनी घेतलेल्या अभ्यासपूर्ण विवेचनांचा समावेश ह्या ग्रंथात आहे.
ह्या सद्गुरु-विवेचनांमधून श्रीनर्मदा परिक्रमेचे अंतरंग, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून उलगडले आहेत. श्रीनर्मदा परिक्रमा हे एक सत्कर्म आहे. अतिप्राचीन काळापासून नर्मदा किनारी अनेक संत-सत्पुरुषांनी तप केलं आहे. म्हणूनच नर्मदेच्या जलात आणि तिच्या तटांवरील क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणात सुप्त शक्तीचा संचय आहे. त्यामुळे नर्मदा हे एक शक्तीकेंद्र बनले आहे. शक्तीकेंद्राला घातलेल्या प्रदक्षिणेतून नेहमीच गती आणि शक्ती निर्माण होत असते. ती गती स्वत: ती परिक्रमा करणाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना उपयोगी पडते. ही गती आपण आपल्या मनालाही देऊ शकतो. नि:स्वार्थ सत्कर्माद्वारे जेव्हा अशी गती मनाला दिली जाते, तेव्हा सगळे कर्मनियम, निसर्गनियम, ईश्वरी नियम बाजूला जाऊन ‘सद्गुरुकृपा’ हा एकच नियम तिथे शिल्लक राहतो. परिक्रमा करताना त्या सद्गुरुशक्तीशी समगत होता आलं पाहिजे असा संदेश ह्या ग्रंथात दिला आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B