श्रीदत्तापराधक्षमापन ह्या स्तोत्राच्या नावातच स्तोत्राचे प्रयोजन आहे की घडलेल्या अपराधांची क्षमा मागणं. यात स्वामीमहाराज, सर्वसामान्य मनुष्याकडून आयुष्यभर झालेल्या अपराधांसाठी, त्यांचे इष्टदैवत असलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या चरणी क्षमायाचना करतात. मायामयी विश्वात सतत अडकत राहून ईश्वरपराड्मुख झालेल्या प्रत्येक मनुष्याचा प्रमुख अपराध म्हणजे ‘गृहितं कदाचिन्न ते नाम दत्त’ अर्थात मी तुझं नाम कधीही घेतलेलं नाही. मनुष्य जन्माचा मातेच्या गर्भापासून सुरु झालेल्या प्रवासात बाल्यकाल, तारुण्य, वार्धक्य अशा सर्वच अवस्थांमध्ये एकदाही तुझ्या (ईश्वराच्या/सद्गुरुंच्या) नामाचे स्मरण राहिले नाही. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहिलो. अशी अखंड अपराधाची भावना ठेवून ‘क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभोक्लिन्नचित्त,’ या शब्दांत वारंवार क्षमायाचना केली आहे.-
– प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी
कोणत्याही साधनेची सुरुवात करण्यापूर्वी आपली मनोभूमिका कशी असावी ह्याचं उत्तम मार्गदर्शन श्री सद्गुरु बापट गुरुजींनी ह्या ग्रंथाद्वारे केलं आहे.
Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1