"वासुदेव उवाच"
"संसार हा खैराचा वृक्ष आहे, चढायला लागलात की इतके काटे बोचतात की तुम्हाला आईचं दूध आठवतं."
भगवान दत्तात्रेयांच्या गुण-कर्म वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे हे श्रीदत्तात्रेयस्तोत्र आहे. ह्या स्तोत्राचे अभ्यासपूर्वक पठण करणाऱ्यांना आणि दत्तोपासनेचे भक्तिपूर्वक आचरण करणाऱ्यांना निसर्ग नियम व दत्तात्रेयरुपी गुरुशक्तीच्या अनुग्रहामधील कार्यकारणभाव समजून येईल हे निश्चित !
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

ह्या स्तोत्रात श्रीदत्तात्रेयांची २९ विशेषणांनी स्तुती केली आहे. कुठल्याही भौतिक कामनांची पूर्ती न मागता “माझं जेवढं तप घडलं आहे, तेथून माझी अवनती होऊ नये म्हणून माझं रक्षण कर,” असं भक्तीचं, साधनेचं आणि अध्यात्माचं रक्षण श्रीदत्तात्रेयांकडे मागितलं आहे. नि:संदेह शरणागत भावाने जो या स्तोत्राचं ज्ञानयुक्त पठण करील, त्याला जय, लाभ, आणि यश हे इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे प्राप्त होईल.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1