"वासुदेव उवाच"
"हेतू जर विशाल असेल तर संकल्पाला निसर्गाची अनुकूलता मिळते."

जीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा आपण ठरवतो एक आणि होतं दुसरंच. कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशावेळी निश्चितपणे सुचवावंसं वाटतं की, स्वामीमहाराजांच्या (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा आधार घ्यावा. या स्तोत्राच्या आवर्तनाने आत्मविश्वास निश्चितपणे वाढतो आणि संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं.
    – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

सहा श्लोकांच्या ह्या संस्कृत स्तोत्रात प्रत्येक श्लोक हा एक स्वतंत्र मंत्र आहे. ‘अघोर’ म्हणजे जे घोर नाही ते. “मी माझी सर्व शक्ती, सर्व सामर्थ्य ह्या स्तोत्रात प्रोक्षित केली आहे. हे स्तोत्र सद्गुरुंच्या आज्ञेने जे जे पठण करतील, त्यांना त्याचे इच्छित असे लाभ कमी-अधिक काळात का होईना पण मिळतीलच; तसंच त्याहूनही श्रेष्ठ अशी अद्वैत भक्ती प्राप्त होईल”, असे स्वामी महाराजांचे आशीर्वाद ह्या स्तोत्राला आहेत. जीवनातील समग्र दु:खांचे निवारण ह्या स्तोत्राच्या पठणाने शक्य आहे. परंतु त्यासाठी ह्या स्तोत्राचे श्रद्धा आणि एकाग्रतापूर्वक ज्ञानयुक्त पठण आवश्यक आहे. प्रत्येक श्लोकातला शब्दार्थ, लक्ष्यार्थ आणि गुह्यार्थ कळावा ह्यासाठी पूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी सलग तीन दिवस घेतलेल्या सहा विवेचनांचा समावेश ग्रंथात आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1