यज्ञ रहस्य Print E-mail
Bapat Gurujiवैदिक धर्माचा सार्थ अभिमान असला, तरी या पुस्तिकेचा हेतू मात्र धर्मप्रचार नाही. कारण समत्वाची शिकवण देणाऱ्या प्रकाशशक्तीची ही साधना संपूर्ण मानवजातीसाठी आहे. केवल यज्ञसाधनेबाबतची सांप्रतची मानसिकता बदलावी, धर्म-जात-पात-लिंग भेद राहित्याने तिची उपयोगिता सर्वांना समजावी, तिच्याबद्दलचे अपसमज दूर व्हावेत, जेणेकरून हे प्राचीन गतवैभव आपल्या अभ्युदयासाठी समाजाने पुन्हा अंगिकारावे ही अभिलाषा मनात बाळगून, यज्ञसाधनेचे आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले विचारमंथन व त्याचे तात्पर्यस्वरूप निष्कर्ष प्रस्तुत पुस्तकाद्वारे मांडले आहेत. यामागे अर्थातच ज्ञात व अज्ञात, व्यक्ती आणि शक्ती यांची प्रेरणा आहे.

जे पटले, ते प्रथम आचरले, व मगच सांगितले या न्यायाने प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रातर्फे यथाशक्ती दर महिन्यास एक याप्रमाणे सामूहिक यज्ञ उपक्रम आचरला जातो आहेच, परन्तु केंद्राशी संलग्न नसणाऱ्या व आत्मोन्नतीची इच्छा असणाऱ्या, तसेच वैदिक संस्कृतीचा अभिमान असलेल्या अथवा नसलेल्यांनाही, किंवा प्रत्येक धार्मिक आचरणामागील कारणमीमांसा मागणाऱ्या बुद्धीवादी वर्गाला; थोडक्यात म्हणजे इतर सर्व साधक-वाचक वर्गाला ही प्राचीन यज्ञसाधना व तिच्यामागील वैज्ञानिक बैठक यांची माहिती व्हावी या दृष्टीने श्रीगुरुसेवा त्रैमासिकात क्रमश: प्रसिद्ध झालेल्या लेखमालेवरून हे पुस्तक संकलित करण्यात आले आहे. साधक-वाचकांपैकी निदान एखाद्याची जिज्ञासा जागृत होऊ‌न त्याने यज्ञसाधना अंगिकारून आपले कल्याण करून घेतले, तरी या पुस्तिकेचा हेतू सफल झाला असे मी समजेन.

यज्ञसाधना म्हणजे समाजाच्या विशिष्ट घटकाने आचरण्याचे केवळ कर्मकांड नसून यज्ञशक्तीशी समस्पंदित होणाऱ्या प्रत्येकाला आत्मोन्नती साधून देणारे ज्ञानकांड आहे, हे ज्याला त्याची अनुभूती येईल, त्याला समजेल. असे भाग्य सर्वांना लाभो हीच यज्ञेश्वर नारायणाचरणी प्रार्थना!
- बापट गुरुजी


सदर पुस्तकाचे 'धर्मभास्कर, दिवाळी २०११' मधील परीक्षण वाचा...

सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...

सदर पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी