श्रेष्ठ मंत्रशक्ती Print E-mail
Bapat Gurujiभारतीय तत्वज्ञानाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा प्रवास समतेकडे होत आहे आणि प्रत्येक मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे ही संपूर्ण समता स्थापन करणे हेच आहे. त्याकरिता ज्यात परम अर्थ आहे,अशा त्या परमार्थात स्वकल्याण साधून घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य ठरते. प्रत्येक मानवाला आपले अंतिम हित साधण्यासाठी योग्य तो मार्ग आणि साधना उपलब्ध करून देणे, हेच अध्यात्माचे लक्ष्य आहे. जगातील अतिशय प्राचीन समजल्या जाणार्‍या आपल्या भारतीय संस्कृतीने मानवाला काही विशेष देणग्या दिल्या आहेत. मंत्रशक्ती आणि यज्ञशक्ती या त्यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण म्हणाव्या अशा देणग्या !

आपल्या संस्कृतीने निर्मिलेल्या मंत्रांचा उपयोग सामाजिक स्वास्थ्याकरिता होऊ शकतो. या मंत्रशक्तीचे यज्ञसन्मुख सामूहिक उच्चारण हे वैयक्तिक तसेच कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मनोस्थैर्य आणू शकते. त्याकरिता प्रथम या मंत्रशक्तिबद्दल समाजात ज्ञानजागृती होणे आवश्यक आहे. हे मंत्र सर्वसमान्यांकरिता सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या या मंत्र आणि सुक्तांचे संकलन आवश्यक वाटले. हे वैदिक मंत्र आणि ऋचा यांचा वापर जेव्हा यज्ञयागात केला जातो, तेव्हा हवनाकरिता त्यांची आवर्तने निराळ्या पद्धतीने करणे अपेक्षित असते. प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रातर्फे घेतल्या जाणार्‍या प्रत्येक यज्ञ यामध्ये त्या त्या मंत्रानुसार समूहाने हविर्द्रव्य अर्पण केले जाते. त्यावेळी सर्वसामान्य उपस्थित जिज्ञासू यज्ञसाधकांनाही या मन्त्रोच्चारणाची व त्याच्या पद्धतीची ओळख व्हावी, तसेच मंत्रांच्या सामूहिक उच्चारणात त्यांचाही ज्ञानोत्तर सहभाग असावा व यज्ञ साधकांकरिता याबाबतचे नियमही सहज उपलब्ध असावेत, यासाठी 'श्रेष्ठ मंत्रशक्ती' या पुस्तिकेचे प्रयोजन आहे. यामध्ये गणेश अथर्वशीर्ष, ब्रह्मणस्पतिसूक्त, श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त, देवीसूक्त, श्रीविष्णूसहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र, रुद्राध्याय, पुरूषसूक्त, विष्णूसूक्त, श्री गुरुस्तुति,दत्तात्रेय स्तोत्र, (अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र, मंत्रात्मक श्लोक, शिवमहिम्नस्तोत्र, अन्नपूर्णाष्टकमस्तोत्र, मंत्रपुष्पांजली इ. चा समावेश आहे. सन २००३ पासून आजपावेतो या पुस्तिकेच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.


सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी