नर्मदा नित्यपाठ Print E-mail
Bapat Gurujiपुण्यजला मोक्षदायिनी श्री नर्मदेची परिक्रमा म्हणजे अध्यात्मातल्या प्रत्येक साधकासाठी एक दुर्मिळ, अलभ्य पर्वणी आहे. ’यज्ञ’ हे एक श्रेष्ठ वरदान असून, त्याची पुनर्स्थापना व्हावी आणि त्याचा लाभ सर्व समाजाला मिळावा या उद्देशाने अहर्निश कार्य करणारे, आमचे स्फूर्तीस्थान परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर - डिसेंबर २०११ या कालावधीमध्ये प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रामार्फत, श्रीनर्मदा परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिक्रमेदरम्यान नित्याने घडणारे नर्मदा पूजन, अर्घ्यदान तसेच विशिष्ट स्थानांवर आयोजित होणारे यज्ञ, दीपदान, जलपूजन यासारख्या आध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रसंगी, पठण करण्यात येणारी श्रीनर्मदेची स्तोत्रे, आरत्या, लहरी आणि मंत्र, प्रत्येक साधकाला सुलभतेने उपलब्ध व्हावेत याकरिता ’श्रीनर्मदा नित्यपाठ’ ही सुबोध पुस्तिका प्रसिद्ध करत आहोत. नर्मदा परिक्रमा करणा-या प्रत्येकाला या नित्यपाठाचा उपयोग होईल असा विश्वास वाटतो.

परिक्रमेचे नियोजन करण्यामध्ये भालोदचे पूज्य श्री प्रतापे महाराज, तिलकवाड्याचे पूज्य श्री विष्णुगिरी महाराज, नेमावरचे पूज्य श्री गाडगीळ महाराज, बडवाहचे पूज्य श्री श्रीराम महाराज, ठाण्याचे श्री नर्मदाप्रसाद (श्री दिगंबर जोशी), पुण्याचे श्री सुहास लिमये आणि इतर अनेक शक्ती आणि व्यक्तींकडून मिळालेला अपूर्व सहयोग पाहता, हा संकल्प म्हणजे एक पूर्वनियोजित सुयोग आहे याची खात्री वाटते. या सर्वांप्रती आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांची प्रेरणा आणि श्री नर्मदा मैय्याचे आशीर्वाद यामुळे हा परिक्रमा संकल्प सफल सिद्ध होणार यात तीळमात्र शंका नाही. नर्मदे हर!


सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी