श्रीगुरुस्तुति – संपूर्ण अर्थ व विवेचन Print E-mail
Bapat Gurujiआध्यात्मिक पायवाट चालू इच्छिणा-या सामान्य मनुष्याच्या मनात मुळातूनच एक गोंधळ असतो - 'सगुण कि निर्गुण ? द्वैत कि अद्वैत ?' भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान निर्गुण तत्वाचा उपदेश करते, मात्र सदैव प्रतीतीस येते ते द्वैतात्मक सगुण विश्व. याच कारणामुळे मनुष्याच्या बुद्धीत विक्षेप निर्माण होतो.

वस्तुतः सगुण आणि निर्गुण ही तत्वे एकमेकांविरुद्ध नाहीत. निर्गुणाचा स्वीकार करताना, सगुणाचा त्याग अपेक्षित नाही व ते हिताचेही नाही. त्यांच्यातील परस्पर संबंधाला अनुसरून, निर्गुण तत्वाचा पुरस्कार करणारे उपनिषदातील तत्वज्ञान आणि सामान्य मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनात त्याला आवश्यक असणारी सगुणोपासना यांचा उत्तम समन्वय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या 'श्री गुरुस्तुति' या स्तोत्रातआहे.

साधारणतः 'कोऽहं' म्हणजे 'कोण मी ?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मनुष्य अध्यात्माची पायवाट चोखाळतो. थोड्याश्या श्रवण-मननानंतर प्रश्नाचे उत्तरही त्याला मिळते - 'सोऽहं' म्हणजे 'तोच मी !' या उत्तरातील 'सो' म्हणजे 'तो' मात्र ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. हा 'सो' कोठे व कशात शोधावा, याचे ज्ञान श्रीमद थोरल्या स्वामी महाराजांनी या स्तोत्रात मुक्त हस्ते उधळले आहे.

विश्वातील अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ती आणि शक्ती यांच्या प्रेरणेनुसार या स्तोत्रावर, खोपोली येथील स्थानी मी विवेचने केली होती.भक्तिरसात ओथंबून निर्गुण तत्वाचे वर्णन करणा-या या स्तोत्रात भक्तीरसाबरोबरच उच्च तत्वज्ञानात्मक भाग असल्याने, त्यातील अध्यात्मिक सौंदर्यस्थळे जपत, सगुणाकडून निर्गुणाकडे, द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा हा स्तोत्ररूपी गालीचा सोप्या भाषेत उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आस्वाद घ्यावा व 'सोऽहं' चे वस्तुनिष्ठ उत्तर प्रत्येकाने मिळवावे, ही सदिच्छा.

- बापट गुरुजी

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘श्रीगुरुस्तुति स्तोत्र‘ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘तो पूर्ण आनंद गुरू समर्थ – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हा ग्रंथ प.पू.श्रीगुरुजींच्या पवित्र हस्ते जानेवारी २०१० मध्ये प्रकाशित केला आहे.

(१) डॉ.भारवि खरे यांनी केलेले ग्रंथ परिक्षण - ‘पूर्ण आनंद गुरू समर्थ’चे दर्शन – श्रीगुरुस्तुति

(२) श्री.श्रीराम मराठे, पुणे यांनी केलेले ग्रंथ परिक्षण - श्रीगुरुस्तुति – संपूर्ण अर्थ व विवेचन
सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...

सदर पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी