अघोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन Print E-mail
Bapat Gurujiजीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशा वेळी निश्चित सुचवावसं वाटतं की, श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या या अघोरकष्टोद्धरणस्तोत्राचा आश्रय घ्यावा. या स्तोत्राच्या आवर्तनाने आत्मविश्वास निश्‍चितपणे वाढतो आणि संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं.

विश्वातील अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ति आणि शक्ति यांच्या प्रेरणेनुसार या स्तोत्रावर, खोपोली येथील स्थानी मी विवेचन केलं होतं.स्तोत्राचा मथितार्थ सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो अर्थ समजून घेऊन जे पठण करतील, त्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जसा भाव तसा अनुभव, हा अध्यात्मातील नियम असल्याने, यश मिळेलच अशा सकारात्मक विचाराने या स्तोत्राचं पठण करावं. या स्तोत्राच्या सामर्थ्याचा अनुभव पिढयान् पिढया लोकांनी घेतला आहे. सर्व साधकांनीही आपल्या अनुभवाच्या कक्षेत या स्तोत्राचं सामर्थ्य आणावं, हीच माझी सदिच्छा आहे.

— बापट गुरुजी.परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘अघोरकष्टोद्धरणस्तोत्र’ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘अघोरकष्टोद्धरणस्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हे पुस्तक मराठी व गुजराती भाषांमधे प्रकाशित केले आहे.

सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...

सदर पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी