परमपूज्य सद्‍गुरु श्री.बापट गुरुजींचा परिचय

Bapat Gurujiपरमपूज्य श्री श्री वासुदेव वामन बापट गुरुजी (Shri Shri Vasudev Vaman Bapat Guruji) यांचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. श्रीगुरुजींनी सतत १६ वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे, तसेच सतत ७ वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. इ.स.२००२ मधे १०८ यज्ञ पूर्ण झाले,परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.श्री गुरुजींनी २००५ मधे सुरू केलेल्या सात दिवसांच्या यज्ञ कार्यक्रमांचे सात वर्षांचे चक्र नोव्हें.- डिसें.२०११ मधे झालेल्या नर्मदा परिक्रमेतील यज्ञ कार्यक्रमांत पूर्ण झाले आहे. सप्टें.-ऑक्टो.२०१२ मधे श्रीगुरुजींनी गंगा परिक्रमा (चारधाम व पंचप्रयाग)२५० साधकांना घेऊन पूर्ण केली आहे. या कालावधीत १२ यज्ञ संपन्न झाले आहेत.


श्रीगुरुजींनी कल्याण,बदलापूर,खोपोली,नागोठणे,मुंबई,ठाणे,भिवंडी,वांगणी,निर्मळ(वसई),पेण,रत्नागिरी,डहाणू,अकलूज,जळगाव, मिरज, कोळीसरे(लक्ष्मीकेशव), अडिवरे(जि.रत्नागिरी),गुहागर(व्याडेश्वर),हेदवी,वेळणेश्वर,गणपतीपुळे,गरुडेश्वर,नृसिंहवाडी, अम्बेजोगाई,केडगाव, कोल्हापूर,सप्तश्रुंगगड,श्री क्षेत्र माहुर,श्री क्षेत्र तुळजापूर,हरिद्वार,चित्रकूट,नैमिषारण्य,पुष्कर, मडगाव (गोवा),दिल्ली, बडोदे, अमदाबाद,पुणे तसेच नोव्हें.-डिसें.२०११ मधे केलेल्या 'श्री नर्मदा परिक्रमे' अंतर्गत श्रीक्षेत्र ओंकारेश्वर, प्रकाशा, भालोद,मोटी कोरल (नारेश्वर),तिलकवाडा,महेश्वर,बड़वाह,नेमावर,अमरकंटक,होशंगाबाद, इ. स्थळी आणि सप्टें.-ऑक्टो.२०१२ मधील चारधाम व पंचप्रयाग या सर्व ठिकाणी अशा भारतभर ३४५हून अधिक यज्ञ संपन्न केले आहेत.यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, हरिहर यज्ञ,पितृयज्ञ, नर्मदा स्वाहाकार,गंगालहरी स्वाहाकार,गंगा-यमुना-सरस्वती स्वाहाकार,गीता यज्ञ,शक्ती स्वाहाकार इ.चा समावेश आहे.जुलै २००३ पासून बदलापूर येथे दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी यज्ञ आयोजित केला जातो.श्री गुरुजी दि. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी ब्रह्मलीन झाले.


श्री गुरुजींनी 'यज्ञ' विषयावर केलेल्या विवेचनांवरील 'यज्ञरहस्य' हा मराठी व हिंदी भाषांमधील ग्रंथ नोव्हें.२०११ मधे प्रकाशित झाला आहे. श्रीगुरूजींनी ‘श्रेष्ठ मंत्रशक्ति’ या पुस्तकाद्वारे श्रीगणेश अथर्वशीर्ष, ब्रह्मणस्पतिसूक्त,श्रीसूक्त,लक्ष्मीसूक्त, देवीसूक्त, श्रीविष्णुसहस्रनाम,श्रीरामरक्षास्तोत्र,रुद्राध्याय, पुरुषसूक्त, विष्णुसूक्त, (अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र, मंत्रात्मक श्लोक, श्रीशिवमहिम्नस्तोत्र, गुरुस्तुती, दत्तात्रेय स्तोत्र, अन्नपूर्णाष्टकम स्तोत्र इ. मंत्रांचे संकलन तसेच नर्मदा नित्यपाठ, गंगा गीतावली यज्ञसन्मुख पठणासाठी साधकांना उपलब्ध करून दिले आहेत.
'नमो गुरवे वासुदेवाय:मंत्र आणि यंत्र साधना', यज्ञरहस्य, (अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र, करुणात्रिपदी, श्रीदत्तात्रेयस्तोत्र, श्रीगुरुस्तुति स्तोत्र -‘तो पूर्ण आनंद गुरू समर्थ –संपूर्ण अर्थ व विवेचन’, संतोपदेश (५ भाग),'चित्तसद्बोधनक्षत्रमाला स्तोत्र' ,"विचारें मना तूंचि शोधूनि पाहें", "(A)ghorakashtoddhranana Stotra : The entire Substance and Interpretation", 'श्रीनवरत्नमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन' , "श्रीनर्मदा परिक्रमा: एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा",'मंत्रात्मक श्लोक: संपूर्ण अर्थ आणि विवेचन,'ध्यानातून ध्येयाकड़े' यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.श्री गुरुजींनी प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या स्तोत्रांचे संकलन "स्तोत्रसुधा" साधकांना उपलब्ध करवून दिलेले आहे.

आजपर्यंत श्रीसद्गुरुंची एकंदर २८ पुस्तके विविध भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ह्या शिवाय संतकृपा, गुरुसेवा, अक्कलकोट स्वामी दर्शन अशा अनेक प्रसिद्ध मासिकांमध्ये आणि दैनिकांमध्ये १९० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
श्री गुरुजींनी साधकांना मार्गदर्शनपर अशी एकूण २८ अध्यात्मिक पुस्तके आजपर्यंत उपलब्ध करून दिलेली आहेत. अधिक माहितीसाठी 'प्रकाशित साहित्य' हा विभाग बघावा.
पुस्तक परिचय व परिक्षण येथे वाचा :-


परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘श्रीगुरुस्तुति स्तोत्र‘ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘तो पूर्ण आनंद गुरू समर्थ – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हा ग्रंथ यांनी प.पू.श्रीगुरुजींच्या पवित्र हस्ते २६ जानेवारी २०१० मध्ये प्रकाशित केला आहे. (डॉ.भारवि खरे यांनी केलेले ग्रंथ परिक्षण येथे वाचा - ‘पूर्ण आनंद गुरू समर्थ’चे दर्शन – श्रीगुरुस्तुति).

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी