"संतोपदेश" - मनोगत (भाग १ ते ५)
अध्यात्मातल्या अनेक गूढ आणि गुह्य विषयांची उकल सहज-सोप्या शब्दात करून, सामान्यातल्या सामान्य साधकापर्यंत तो संदेश अचूकपणे पोहोचविण्याची विलक्षण किमया श्री परम पूज्य बापट गुरुजींच्या विवेचनांमध्ये असते. परम पूज्य श्री गुरुजींनी विविध प्रसंगी भक्तांच्या ज्ञानवर्धनासाठी घेतलेली शेकडो अभ्यासपूर्ण विवेचनं आजही उपस्थित श्रोतृवृंदाच्या चिरस्मरणात आहेत. या विवेचनांवर आधारित असलेले लेख, पुण्याच्या "संतकृपा" या दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित आध्यात्मिक मासिकांतून, ’संतोपदेश’ या सदराखाली सन २००९ पासून प्रसिद्ध होत आहेत.

भक्तांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी उपयुक्त असणारं हे श्रेष्ठ विचारधन अधिकाधिक साधकांपर्यंत पोहोचावं या सद्हेतूने प्रस्तुत पंचवीस लेख ’संतोपदेश’ या पुस्तिका-मालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या मालिकेत, "वर्तमान एक संधिकाल", "ज्ञानदीप उजळू दे", "सुखाचा शोध", "गुरु तोचि देव", आणि "साधना मार्ग प्रदीप" अशा पाच पुस्तिकांचा समावेश आहे. संतकृपाचे प्रतिभावंत संपादक श्री भारवि खरे यांनी या पुस्तिकांना अत्यंत समर्पक आणि यथोचित अशा प्रस्तावना दिल्या आहेत.

या मालिकेतील प्रथम पुष्प म्हणजे "वर्तमान एक संधिकाल" या पुस्तिकेत एकंदर पाच लेखांचा समावेश आहे. कर्मगतीच्या जीवनरूपी चक्रव्यूहात अडकल्यामुळे भांबावून गेलेल्या प्रत्येक मनुष्याला या पुस्तिकेच्या वाचनाने अनमोल मार्गदर्शन मिळेल असा विश्वास वाटतो.

या मालिकेतील दुसरे पुष्प म्हणजे "ज्ञानदीप उजळू दे !" या पुस्तिकेमध्ये एकूण सहा लेखांचा समावेश आहे. साधकाची ज्ञान जिज्ञासा, भक्ती आणि साधन निष्ठा वाढवून ज्ञान, कर्म आणि भक्ती मार्गांवरची एकत्रित साधना करण्याचा संदेश याद्वारे दिला आहे.

या मालिकेतील तिसरे पुष्प म्हणजे "सुखाचा शोध" या पुस्तिकेमध्ये एकूण चार लेखांचा समावेश आहे. सुखाच्या शोधार्थ दिवसरात्र झगडणा-या आणि तरीही दुःखाच्या गर्तेत अडकलेल्या प्रत्येकाला या लेखांमधून ख-या सुखी जीवनाची गुरुकिल्ली सापडू शकेल असा विश्वास वाटतो!

प्रारब्धबळाने सद्गुगुरुंची प्राप्ती झाली पण शिष्यालाच जर सत्शिष्य होता आलं नाही तर जीवन व्यर्थ जाण्याचा संभव असतो. याकरिता या मालिकेतील चौथे पुष्प, "गुरु तोचि देव", ही पुस्तिका प्रत्येक सद्गुरुभक्ताने आवर्जून वाचावी. मग तो कोणत्याही पंथाचा, संप्रदायाचा किंवा परंपरेतला शिष्य असो.

या मालिकेतील अंतिम पाचवे पुष्प, "साधना मार्ग प्रदीप" या पुस्तिकेत एकूण पाच लेखांचा समावेश आहे. अंगी मुमुक्षत्त्व असूनही प्राथमिक अवस्थेतला साधक, साधना मार्गावर प्रगती करताना हमखास अडखळतो. त्याच्याकडून अनवधानाने काही अपराधही घडतात. अशा "धडपड्या" साधकाला या पुस्तिकेतूनच नव्हे तर या पंचपुस्तिकांच्या मालिकेतून भक्कम आधार मिळेल असा विश्वास वाटतो!

प्रस्तुत पंचपुस्तिका वाचणा-या प्रत्येक साधक-वाचकाला योग्य गती-मती आणि शक्ती लाभावी हीच सद्गुरुचरणी प्रार्थना !!!

- बापट गुरुजी


सदर पुस्तके या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...


 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी