श्रीगंगा गीतावली
गंगामाहात्म्य वेदकाळापासून ते पुराणकाळापर्यंत गायले गेले आहे. तिच्या अवतरणाची कथा वाल्मीकि रामायणात विस्ताराने आली आहे. आदिकवी वाल्मीकिंनी केलेली तिची स्तुती, जगन्नाथ पंडितांनी तिच्यावर केलेले समर्पणात्मक गंगालहरी काव्य, आदि शंकराचार्यांनी रचलेले गंगाष्टक आणि गंगास्तोत्र, स्वामी महाराजांनी गुंफलेले मंत्रगर्भ गंगास्तोत्र अशा अनेक उत्तमोत्तम स्तोत्र आणि काव्यांचा समावेश करून चारधाम यात्रेप्रसंगी पठण करण्यासाठी विविध गंगास्तोत्रे, लहरी, नामावली, आरत्या, यमुनाष्टक आणि ध्यानमंत्रांचे संकलन ’श्रीगंगा गीतावली’ या पुस्तिकेद्वारे उपलब्ध करून देताना केंद्राला अतिशय आनंद होतो आहे. प्राचीन काळापासून आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ’चारधाम-पंचप्रयाग’ या तीर्थस्थळांची यात्रा करण्याचं नियोजन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांची प्रेरणा आणि आमचे स्फूर्तीस्थान परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या आशीर्वादाने माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०१२ या कालावधीमध्ये प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रामार्फत करण्यात आलं होतं. या पुण्य-यात्रेचा समारोप कुरुक्षेत्रावर घेण्यात येणा-या श्रीमद्भगवद्गीता यज्ञाने झाला.

प.प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि भगवती गंगेचा अनुपमेय स्नेहबंध सर्व वासुदेव भक्तांना ज्ञात आहेच. श्रीदत्तप्रभुंच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांनी एकूण सहा चातुर्मास गंगाकिनारी केले. तसेच इ.स. १८९४-९५ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये श्रीमहाराजांनी अत्यंत दुर्गम अशा हिमालय क्षेत्रात पदभ्रमण करत चारधाम-पंचप्रयागांसह इतर महत्त्वाच्या तपस्थलींना भेट दिली आणि श्रीगंगामाईच्या प्रेरणादायी सान्निध्यात अनेक उत्तमोत्तम स्तोत्र-ग्रंथांची निर्मिती केली. दुर्दैवाने या यात्रेचा विस्तृत वृत्तांत आज ज्ञात नाही. श्रीस्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चारधाम-पंचप्रयागस्थळी यज्ञ, गंगामाईची नित्याराधना, नामस्मरण, पितृतर्पण, दीपदान, जलार्चना असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आले.

या पुस्तिकेच्या संकलनामध्ये अनेक भक्तांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. डॉ. बिनीवाले यांनी संपूर्ण संहिता तपासून, सर्व भक्तांना पुस्तिकेतल्या स्तोत्र-काव्याचं सहजरीत्या पठण करता येईल असं सादरीकरण करून या गीतावलीच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. श्रीक्षेत्र चारधाम-पंचप्रयागांची यात्रा करणा-या प्रत्येक भक्ताला या गीतावलीचा नित्य पठणासाठी उपयोग व्हावा आणि त्याला श्रीगंगामाईचे कृपाशीर्वाद लाभावेत हीच सद्गुरुचरणी प्रार्थना!

हरऽ हरऽ गंगे!
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी