|| नमो गुरवे वासुदेवाय ||

प्राचीन समाजधुरीणांनी जनसामान्यांसाठी पुरस्कृत केलेला यज्ञसाधनेचा मार्ग आजच्या आधुनिक काळातही सामान्य जनांसाठी प्रशस्त करून देणारे बदलापूरचे परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी कार्तिक शुद्ध चतुर्थी, शके १९३७, रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०१५ रोजी अल्प आजारानंतर ब्रह्मलीन झाले.

गेली बावीस वर्षे यज्ञसाधना करणाऱ्या सद्गुरु श्री बापट गुरुजींनी बदलापूर परिसरात १५ वर्षांपूर्वी यज्ञपर्व सुरु केले, जे त्यांनी आखलेल्या रूपरेषेप्रमाणे कित्येक समाजोपयोगी उपक्रमांसह अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आजतागायत सुरु आहे.

खोपोली परिसरातही परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या कार्याचे आणि त्यांच्या साहित्याच्या प्रचाराचे कार्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे अव्याहतपणे चालू होते. आजवर हजारो जिज्ञासूंनी त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. कित्येक आध्यात्मिक प्रमेये आणि सिद्धांतांची उकल करून गुह्य ज्ञान देणारी कित्येक विवेचने करून त्यांनी समाजाला उपकृत केले आहे. त्यांची विचारधारा काही ग्रंथांद्वारे प्रसिद्धही झाली आहे. जात-पात, लिंग, धर्म असा कोणताही भेद न बाळगता, 'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' अशा नि:स्पृहतेने काम करत प्रकृतीच्या तक्रारींना न जुमानता त्यांनी जे कार्य उभे केले आहे, समाजापुढे जो जिद्दीचा, सत्कर्माचा आदर्श ठेवला आहे, त्याला तोड नाही. ह्या आधुनिक यज्ञपुरुषाला शतश: नमन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

ज्याने हें व्यापिलें सर्व तें जाण अविनाश तूं ।

नाश त्या नित्य-तत्त्वाचा कोणी हि न करूं शके ।। (गीताई: २.१७)

 
॥ श्रीगुरु वासुदेव यंत्र ॥
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमद्‍ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी, श्रीदत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांनी श्रीगुरु वासुदेव यंत्राचे विमोचन केले. मंत्रसाधनेला यंत्रसाधनेची जोड दिली तर त्यातून निर्माण होणारी प्रचंड आध्यात्मिक शक्ती साधकाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या किंबहुना संपूर्ण विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयुक्त ठरेल या भव्य हेतूने श्री गुरुजींनी हे यंत्र सर्व साधकांना उपलब्ध करून दिले आहे.
पुढे वाचा...
 
यज्ञ एक वरदान

Yadnyaयज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, हरिहर यज्ञ,पितृयज्ञ, नर्मदा स्वाहाकार,गंगालहरी स्वाहाकार,गीता यज्ञ,शक्ती स्वाहाकार इ.चा समावेश आहे.

पुढे वाचा...
 

  आगामी कार्यक्रम

(यज्ञस्थळ: गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर(पूर्व); वेळ :स.९.३० ते सायं.५; )

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी


दिनांक 11 सप्टेंबर २०१६ रोजी श्री गणेश यज्ञामध्ये परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी लिखित " श्री दत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन " ह्या ग्रंथाचे अनावरण पूज्य आईंच्या हस्ते संपन्न झाले.

प.पू. श्रीसद्गुरुंच्या 'मंत्रात्मक श्लोक: संपूर्ण अर्थ आणि विवेचन' ह्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दि.९ ऑगस्ट २०१५ रोजी संपन्न झाला.
 श्री सद्गुरुंचे मनोगत इथे वाचा...

"नवरत्नमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन" ह्या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या उपस्थितीत नुकतेच झाले.
 पुढे वाचा...
"स्तोत्रसुधा"

दिनांक १४ फेब्रुवारी २०१६ रोजी, "स्तोत्रसुधा" हे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित निवडक स्तोत्रांचे संकलनात्मक पुस्तक यज्ञसाक्षीने पूज्य आईंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

दिनांक १० जानेवारी २०१६ रोजी परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींचा “ ध्यानातून ध्येयाकडे” हा ग्रंथ प्रकाशित झाला. ग्रंथाचे विमोचन पूज्य आईंच्या शुभ हस्ते यज्ञ साक्षीने करण्यात आले.
ध्यानातून ध्येयाकडे ह्या ग्रंथाचा, डॉ. भारवि खरे, संपादक ’संतकृपा’ ह्यांनी केलेला पुस्तक परिचय

ध्यानातून ध्येयाकडे ह्या ग्रंथाचे परीक्षण
"नमो गुरवे वासुदेवाय"

नमो गुरवे वासुदेवाय : मंत्र आणि यंत्र साधना ह्या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या उपस्थितीत संतकृपा मासिकाचे संपादक डॉ. श्री भारवि खरे ह्यांच्या हस्ते नुकतेच दिनांक २२ जुलै २०१३ रोजी श्रीगुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झाले.  पुढे वाचा...
"Shri Vasudev Yati - विमोचन सोहळा "

प पू स्वामी विराजानंद विरचित 'परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज' यांचे जीवन चरित्रावर आधारित "Shri Vasudev Yati" या इंग्रजी ग्रंथाचे विमोचन यज्ञनारायणच्या साक्षीने 'प पू श्री सद्गुरू बापट गुरुजींच्या' हस्ते दिनांक ८ जून रोजी बदलापूर येथे झाले.  पुढे वाचा...
"विचारें मना तूंचि शोधूनि पाहें"

"विचारें मना तूंचि शोधूनि पाहें" ह्या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या उपस्थितीत नुकतेच झाले.  पुढे वाचा...
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत