परमपूज्य श्रीगुरुजी (Shri Bapat Guruji)

श्रीगुरुजींचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला आहे. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती.श्रीगुरुजींनी सतत १६वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे तसेच सतत ७वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. श्रीगुरूजींनी इ.स.२००० मधे कल्याण येथे ‘प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र’ स्थापन केले. इ.स.२००२ मधे १०८यज्ञ पूर्ण झाले परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.
श्रीगुरुजींनी कल्याण, अकलूज, जळगाव,मिरज, बडोदे, गरुडेश्वर,नृसिंहवाडी, गोवा, दिल्ली, हरिद्वार,चित्रकूट, नैमिषारण्य,पुष्कर अशा भारतभर २२५ हून अधिक यज्ञ संपन्न केले आहेत. यामधे गणेश यज्ञ,गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, पितृयज्ञ इ. चा समावेश आहे. जुलै २००३पासून बदलापूर येथे दर महिन्याच्या दुसर्या रविवारी यज्ञ आयोजित केला जातो.
श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या प्रेरणेने सन २००४च्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर ओम् सद्गुरू प्रतिष्ठान ( बोरीवली, मुंबई–संकेतस्थळ www.ospratishthan.org ) येथे श्रीगुरूजी सद्गुरूपदी विराजमान झाले आहेत.
श्रीगुरूजींनी ‘श्रेष्ठ मंत्रशक्ति’ या पुस्तकाद्वारे अथर्वशीर्ष, ब्रह्मणस्पतिसूक्त, श्रीसूक्त, देवीसूक्त, रुद्राध्याय, विष्णुसहस्रनाम, विष्णुसूक्त, रामरक्षास्तोत्र, पुरुषसूक्त, मंत्रात्मक श्लोक, घोरकष्टोद्धरणस्तोत्र इ. मंत्र साधकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘घोरकष्टोद्धरणस्तोत्र’ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘(अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हे पुस्तक ‘ओम् सद्गुरू प्रतिष्ठान’ यांनी मराठी व गुजराती भाषांमधे प्रकाशित केले आहे. (येथे वाचा (१)-पुस्तक परिचय- डॉ.सौ.केळकर;(२) पुस्तक परिक्षण-डॉ.सौ. हेमा क्षीरसागर, आकाशवाणी पुणे akashwaniparikshan )
आता श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली येथे नित्योपासना व भक्तांचे शंकासमाधान होत असते. बोरीवली येथे बाल संस्कार वर्ग व आरोग्य शिबिर हे उपक्रमही चालू आहेत. खोपोली येथेही नियमितपणे भक्तीसत्संग मेळावे, सामूहिक मौंजीबंधन,पालखी व अनेकविध समारंभ चालू आहेत. सामाजिक बांधिलकी जाणून या संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी विद्यार्थी दत्तक योजना, पूरग्रस्तांसाठी वस्त्र पुरवठा, वैदिक मंत्रांद्वारे जन्मपूर्व गर्भसंस्कार योजना, वैद्यकीय शिबिर इत्यादी योजनाही हाती घेतल्या आहेत.